इगतपुरीत हजारो रेशन कार्डधारकांचे धान्य बंद; आगरी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीत हजारो रेशन कार्डधारकांचे धान्य बंद; आगरी सेनेचे तहसीलदारांना निवेदन
Published on: 
फोटो :05405 इगतपुरी : तहसीलदार अभिजित बारवकर यांना निवेदन देताना आगरी सेनेचे पदाधिकारी. लाभार्थ्यांना त्वरित धान्य देण्याची मागणी आगरी सेनेचे तहसीलदरांना निवेदन; तीव्र आंदोलनाचा इशारा सकाळ वृत्तसेवा घोटी, ता. २९ : इगतपुरी तालुक्यातील हजारो शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा समावेश प्राधान्येतर कुटुंब प्रवर्गात झाल्याने धान्यपुरवठा बंद झाल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्य मिळावे, या मागणीसाठी आगरी सेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. इगतपुरी तालुका आदिवासीबहुल असून, अनेक गरीब, गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर अवलंबून आहेत. शिधापत्रिकेच्या प्रवर्गातील बदलामुळे अनेक कुटुंबांना धान्य मिळण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. धान्यपुरवठा बंद झालेल्या शिधापत्रिकांची गावनिहाय व रास्त भाव दुकाननिहाय तपासणी करावी, पात्र कुटुंबांचा योग्य प्रवर्गात समावेश करावा, ई-केवायसी व ऑनलाइन नोंदींमधील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष शिबिरे घ्यावीत, तसेच पुरवठा विभागात एक खिडकी योजना सुरू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय, उत्पन्न मर्यादेत वाढ करावी, बंद झालेली रेशन कार्डे एका महिन्यात पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी आणि सहा महिन्यांच्या प्रतीक्षेची अट रद्द करावी, अशी मागणीही आगरी सेनेने केली आहे. आमदार हिरामण खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांत आढावा बैठक घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेऊन पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आगरी सेनेचे तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच हरीश चव्हाण यांनी दिला. संपत डावखर, गणेश कडू, संतोष कडू, अरुण भागडे, शंकर भगत, अनिल भोपे, लालू दुभाषे, विक्रम दुभाषे आदी उपस्थित होते. ...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com