चौंधाणे रस्त्यावर जीवघेणे खड्डे

चौंधाणे रस्त्यावर जीवघेणे खड्डे
Published on: 
चौंधाणे येथील रस्त्याची दूरवस्था ---------------------------- कंधाणे, ता. २५ :डांगसौंदाणे सटाणा रस्त्यावरील चौंधाणे येथील माध्यमिक विद्यालय ते गावाशेजारी सुकडनाला पुलापर्यंत रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरुस्ती करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी पालकांनी दिला आहे. कळवण सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारा व सर्व प्रकारच्या वाहनांची प्रचंड वर्दळ असणारा राज्य मार्ग १९ डांगसौंदाणे सटाणा रस्ता कळवण व बागलाण तालुक्यातील पश्चिम भागासाठी अतिशय महत्त्वाचा दुवा आहे परंतू नेहमीच दुर्लक्षित असणाऱ्या रस्त्यावर चौंधाणे गावाजवळ व पुलावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडल्याने माध्यमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी तसेच रामगीरबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागत आहे. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी जाणारे अवजड वाहने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा रस्ते चुकवित प्रवास करावा लागतो. बांधकाम विभागाने तत्काळ रस्ता दुरुस्त करावा अन्यथा शालेय विद्यार्थी त्यांच्या पालकांनी व वाहनचालकांनी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कंधाणे : रामगीरबाबा मंदिराजवळ पडलेला खड्डा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com