Nashik Fraud Crime: उत्राणेच्या नवरदेवास अडीच लाखाचा गंडा; नववधू पोलिसांच्या ताब्यात

Anita Jadhav aka Pooja Mhaske who cheated the youth by showing the lure of marriage.
Anita Jadhav aka Pooja Mhaske who cheated the youth by showing the lure of marriage.esakal

Nashik Fraud Crime : उत्राणे (ता. बागलाण) येथील नुकत्याच विवाह झालेल्या तरुणाची बुलढाणा जिल्ह्यातील लग्न जमविणाऱ्या टोळीने सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणाने लग्न लावलेल्या तरुणीला पोलिसांच्या स्वाधीन केले असून जायखेडा पोलिस ठाण्यात तरुणाच्या तक्रारीवरून नववधू आणि संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (Utrane husband extorted for two half lakhs Bride in police custody Nashik Fraud Crime)

उत्राणे येथील प्रवीण (नाव बदललेले) काही कामानिमित्त आपल्या नातेवाइकांकडे गेला होता. तेथे विवाहाचा विषय निघाल्यानंतर विजय मुळे नामक लग्न जमविणाऱ्या मध्यस्थीने मुलीचे आई, वडील गरीब असल्याने २ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली.

त्यानंतर परागने अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यानुसार दोन लाख रुपये रोख, पन्नास हजार रुपये विजय मुळे यांच्या फोन पे खात्यावर वर्ग केले. अडीच लाखांची रक्कम मिळाल्यानंतर २५ मे रोजी देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथे प्रवीण याचा विवाह अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के हिच्याशी लावण्यात आला.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पूजाने आपले रंग दाखवायला सुरवात केली. मधुचंद्रासाठीही नकार दिल्यानंतर प्रवीणला तिच्याबद्दल संशय बळावला. याबाबत त्याने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने संपूर्ण हकिगत सांगितले.

यापूर्वी श्रीपूरवडे (ता.बागलाण) येथील हृषीकेश आणि काळगाव (ता.साक्री) येथील चंद्रकांत यांच्याशी आपला विवाह झाला असून विवाहानंतर दोनच दिवसात आपण दागिने घेऊन पोबारा होत असल्याचे तिने प्रवीण यास सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Anita Jadhav aka Pooja Mhaske who cheated the youth by showing the lure of marriage.
Nagpur Crime: कारागृहात गांजा आणि मोबाईल नेता येण्यासाठी वापरली जाते ही युक्ती, पोलीस खात्यात थेट वर पर्यंत...

दोघांप्रमाणे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवीण याने थेट जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना 'फसलेल्या लग्नाची गोष्ट' सांगून लग्नाच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक करणाऱ्या पूजाला पोलिसांच्या स्वाधीन केले.

याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी विजय रामभाऊ मुळे (रा.देऊळगाव राजा) एक अनोळखी इसम (पुजाचे वडील असल्याची बतावणी करणारा) अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के (रा.बालाजी गल्ली शिंदखेडा राजा जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

"ग्रामीण भागात वधुपित्यांच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाह जटिल सामाजिक समस्या बनत चालली आहे. त्यामुळे विवाहाचे आमिष दाखविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. लग्नाच्या आमिषाचे भुरळ घालून खोटे लग्न जमवून फसवणूक करणाऱ्या टोळीचे काही मोहरे परिसरात सक्रिय आहे. ज्यांचे लग्न जमत नाही त्यांना लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवत वरपक्षाकडील लोकांची फसवणूक होण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. बदनामीच्या भीतीने नवरदेवाकडील मंडळी फिर्याद देत नसल्याने हे दलाल पोलिस रडारवर येत नाहीत. फसवणूक झालेल्या इतर तरुणांनी पोलिसांशी संपर्क साधावा." -पुरुषोत्तम शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक

Anita Jadhav aka Pooja Mhaske who cheated the youth by showing the lure of marriage.
Nagpur Crime news : प्रेयसीच्या आईने बोलू दिलं नाही म्हणून प्रियकराचा चाकूहल्ला, अल्पवयीन जोडपे फरार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com