Robbery
Robberyesakal

Nashik Crime News : वडगाव- सिन्नरला भरदिवसा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील वडगाव-सिन्नर येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे बारा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 2 लाख 20 हजारांची रोकड चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे. (Vadgaon Sinnar house burglary in daylight lakhs worth goods stolen Nashik Crime News)

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वडगाव-सिन्नर येते अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून काल (दि.19) काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याने सर्व ग्रामस्थ मंदिराजवळ जमले होते.

हीच संधी साधत दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दत्तात्रय सुकदेव गुंजाळ यांच्या घराचा दरवाजा  तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटात व कोठीत ठेवलेले 5 तोळ्याचा राणीहार,

5 तोळ्याची मोहनमाळ, दीड तोळ्याची पोत, दीड ग्रॅमची नथ, 5 ग्रॅमची अंगठी, 5 ग्रॅमचे कानातील टॉप्स, लहान मुलांची दागिने 1 ग्रॅम असे एकुण अंदाजे 13 तोळ्याचे सोन्याचे दागिने तसेच बॅगमध्ये ठेवलेले 2 लाख 20 हजारांची रोकड चोरुन पोबारा केला.

दत्तात्रय गुंजाळ हे बँक मित्र असून ग्राहकांकडून स्विकारलेली रक्कम त्यांना शनिवार महाशिवरात्रीची सुट्टी असल्यामुळे बँकेत जमा करता आली नसल्याने सदरहू रक्कम गुंजाळ यांनी घरात ठेवली होती.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Robbery
Akola Crime News: शासकीय योजनांचा लाभ देतो सांगून वृद्ध दाम्पत्याची फसवणूक

दुपारी 1 वाजेच्या सुमारास गुंजाळ हे सप्ताहाच्या कार्यक्रमातून घरी आल्यानंतर घराचा दरवाजा तोडलेला दिसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरफोडी होऊन दागिन्यांसह रोख रक्कम चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

गुंजाळ यांनी तात्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस हवालदार सारुक्ते यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यावेळी उपसरपंच संदीप सुरेश आढाव, पोलीस पाटील मीराताई पेढेकर, निलेश बलक, भाऊसाहेब शिंदे, विजय शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाकामी सूचना केल्या. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सारुक्ते करत आहेत. 

Robbery
Aurangabad crime : २० लाखांचा गंडा घालणाऱ्यास अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com