Valentines Day: ‘व्हॅलेंटाईन डे’चा बेत आखलाय...सावधान! खासगी गुप्तहेरांकडून ठेवली जातेय पाळत; पोलीसही सतर्क

सावधान..! लपून-छपून प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्या तरी ‘गुप्त’ नजरेत तुम्ही कैद होऊ शकतात.
Valentines Day planned Beware surveillance by private detectives
Valentines Day planned Beware surveillance by private detectivesesakal

नाशिक : चोरी-छुपे प्रेम करणारे महाविद्यालयीन तरुणाईला ते व्यक्त करण्याची संधी म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’. प्रेमीयुगुल याचसाठी १४ फेब्रुवारीची खूपच आतुरतेने वाट पाहत असतात. तरुणाई असो वा एकमेकांची मने जुळलेले कोणीही असो, ते चोरून-लपूनच आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी याच दिवशी धडपड करतात.

त्यासाठी काहींनी खास प्लॅनही केलेला असतो. पण सावधान, लपून-छपून प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्या तरी ‘गुप्त’ नजरेत तुम्ही कैद होऊ शकतात. खासगी गुप्तहेर मागावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Valentines Day planned Beware surveillance by private detectives Police also alert nashik news)

मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे खासच. त्यामुळे प्रेमीयुगुल या संधीचा फायदा घेणारच. घरच्यांपासून चोरून-लपून सुरू असलेले प्रेमप्रकरण अनेकदा तरुणाईच्या अंगलट येते.

तसेच, काही वैवाहिक असतानाही दुसरा वा दुसरीच्या प्रेमात पडतात. त्यामुळे त्यांनाही याच दिवशी आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करायच्या असतात. मात्र जर अशा प्रेमीयुगुलांबाबत घरातील मंडळींना संशय आला असेल तर त्यांच्याकडूनही अशा प्रेमीयुगुलांवर गुप्त नजर ठेवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरात काही खासगी गुप्तहेर संस्था कार्यरत आहेत. या संस्थांकडे अनेकांनी आपल्या मुला-मुलींवर नजर ठेवण्यासाठी संपर्क साधला आहे. तरुणाईवरच नाही तर अनेक विवाहितांनीही आपल्या पती वा पत्नीवर नजर ठेवण्यासाठीही गुप्तहेर संस्थांकडे संपर्क साधला आहे.

त्यामुळे जर कोणी चोरून-लपून आपले प्रेमप्रकरण करीत असेल आणि उद्या व्हॅलेंटाईन डे निमित्ताने खास प्लॅन केला असेल तर सावधान. तुमच्यावर पाळत ठेवून असलेल्या गुप्तहेरांच्या कॅमेऱ्यात कैद होण्याचीच दाट शक्‍यता आहे.

Valentines Day planned Beware surveillance by private detectives
Marathi News Live Updates : UAE कडून सर्वोच्च सन्मान मिळाल्याने आभार- नरेंद्र मोदी

पोलिसांकडून बंदोबस्त

व्हॅलेंटाईन डे निमित्ताने शहरातील महाविद्यालय, उद्यानांमध्ये तरुणाईची गर्दी असण्याची शक्‍यता आहे. त्यातून वादावादी होऊन अप्रिय घटनाही घडण्याची शक्‍यता गृहित धरून शहर पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

तसेच साध्या वेशातील महिला-पुरुष पोलीसही गस्तीवर असणार आहेत. गोदाघाटावरील सुयोजित व्हॅरिडियन गार्डन परिसरात तरुणाईची गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने त्याठिकाणीही पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

"शहरातील महाविद्यालय, मॉल्स, गार्डन्स याठिकाणी साध्या वेशातून महिला-पुरुष पोलिसांची गस्त राहील. तरुणाईंने सेलिब्रेशन करावे परंतु मर्यादेत करावे अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल."- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

Valentines Day planned Beware surveillance by private detectives
Valentine's Day 2024: व्हॅलेंटाईन डे दिवशीच सर्वाधिक प्रेम विकत घेतलं जातं! काय आहे सत्य?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com