महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव उत्साहात साजरा सवाद्य मिरवणुकीत ३५ हून अधिक मंडळांचा सहभाग

महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव उत्साहात साजरा
सवाद्य मिरवणुकीत ३५ हून अधिक मंडळांचा सहभाग
Published on: 
टुडे ४ मेन फिचर -- यापूर्वी फोटो टाकले आहेत --- महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव उत्साहात वाल्मीक नगरात विविध कार्यक्रम; मिरवणुकीत ३५ हून अधिक मंडळांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा जळगाव,ता.२६ : आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील वाल्मीक नगर येथे सोमवारी (ता. २६) महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन, आरती, मान्यवरांचा सत्कार आणि मनोगत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शहरातील विविध भागांतील मंडळे आणि समाजबांधव एकत्र आले. श्री महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती जळगाव शहर यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वाल्मीक नगर येथे सकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आरती, प्रास्ताविक आणि अध्यक्षांसह प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ३५ हून अधिक मंडळे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवात शहरातील विविध भागांतील ३५ हून अधिक मंडळे सहभागी झाली. वाल्मीक नगर, कांचन नगर, असोदा रोड, जैनाबाद, दिनकर नगर, कोळी पेठ, खालची गल्ली, राजाराम नगर, अयोध्या नगर, खोटे नगर यांसह विविध परिसरांतील मंडळांनी सहभाग नोंदविला. यामध्ये श्री महर्षी व्यास युवा शक्ती बहुउद्देशीय संस्था, श्री महर्षी वाल्मिकी युवा संस्था, जय वाल्मिकी बहुउद्देशीय संस्था, रामभक्त मित्र मंडळ, कोळी बहुउद्देशीय मित्र मंडळ, उज्ज्वल मित्र मंडळ, श्री राम तरुण मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ यांसह विविध मंडळांचा समावेश होता. महापालिका कर्मचारी वर्ग, पोलिस दलातील कोळी समाजबांधव आणि महावितरणमधील कोळी समाजबांधवांचाही सहभाग होता. चौकट मिरवणुकीचे आकर्षण महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर दुपारी दोनला सवाद्य मिरवणुकीला सुरुवात करण्याचे नियोजन होते. विविध मंडळांचे कार्यकर्ते, युवक आणि समाजबांधव या मिरवणुकीत सहभागी झाले. महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांचा प्रसार करणे, सामाजिक एकोपा वाढविणे आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देणे, हा महोत्सवामागील उद्देश होता. चौकट रामायणाच्या रचनेतून आदर्शांचा संदेश आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांनी रामायण या महाकाव्याची रचना करून भारतीय साहित्य आणि संस्कृतीला अमूल्य योगदान दिले. प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील आदर्श, कर्तव्यनिष्ठा, सत्य आणि मर्यादा यांचे महत्त्व रामायणातून अधोरेखित होते. महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करण्यात आले. समाजातील एकता, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com