लखमापूर- गुटखाबंदी असतानाही त्याची सतत होणारी तस्करी आणि कारवाई हे आता नित्याचेच झाले आहे. पोलिस कारवाई करतात,मात्र गुटखा तस्कर त्यातून सहीसलामत कसे सुटतील यासाठी वर हात ओले करून आपली सुटका करून घेतात. त्यामुळे अधूनमधून होणारी कारवाई कायमच्या बंद करण्यासाठी गुटखा तस्करांना मिळणारे पाठबळ थांबवायला हवे. तस्करांच्या या टोळीतील काही छोटे मासे हाती लागतात, मात्र बड्या माशांपर्यंत पोहोचून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज वणी येथे झालेल्या कारवाईवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.