Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

वणी पोलिस ठाण्याच्या प्रांगणातील दत्त मंदिराच्या सभामंडपात पोलिस बांधवांनी दरवर्षाप्रमाणे गणेश गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती.
vani police station ganpati visarjan

vani police station ganpati visarjan

sakal

Updated on: 

वणी (नाशिक) - उत्सव म्हटला की कुटुंबीयांसह आनंदोत्सव साजरा करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उत्सव काळात पोलिसांना बहुतांश वेळ बंदोबस्तावरच राहावे लागते. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद घेण्याची संधी त्यांना अनेकदा मिळत नाही. याच भावनेचा विचार करून वणी पोलिसांनी यंदा आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना कर्तव्याच्या धावपळीतही आनंदाचे क्षण अनुभवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com