वणी- गेल्या अनेक महिन्यांपासून वणी व परिसरात गुटख्याची तस्करी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीच्या मुसक्या वणी पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत सुमारे ११ लाख ६ हजार ८०० रुपयांचा गुटखा व वाहन जप्त केले असून, एकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.