Saptashringi Devi Temple
sakal
वणी: सप्तश्रृंगी मातेचे मूळरूप असलेल्या येथील जगदंबा मातेचे मंदिर व परिसरात मंगळवारी (ता.१३) धनुर्मासाची सांगता व भोगी असा एकत्रित आलेल्या दुग्धशर्करा योगाची पर्वणी साधत शिर्डी - साकुरी शिव येथील शिवशक्ती मित्रमंडळ व श्री सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळांनी सुमारे १७ हजार १ दिव्यांची आरास करून नेत्रदीपक असा दीपोत्सव साजरा केला.