Saptashrungi–Nanduri Ghat
sakal
वणी: श्री सप्तशृंगगड ते नांदुरी या घाटरस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम व घाट लांबीत संरक्षक भिंतीचे बांधकाम वर्षभरापासून रखडले आहे. मात्र ठेकेदाराच्या कंपनीच्या प्लॉटमध्ये बिघाड व मनमानीमुळे काम लांबणीवर पडत आहे. याचा त्रास भाविकांसह ग्रामस्थांना होत आहे. घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण होत असले तरी संरक्षक भिंतीही तेवढ्याच मजबूत करण्याचे किंबहुना आधुनिक तंत्राने करण्याची गरज आहे.