...शेवटी ग्रामस्थांनीच पकडून दिला वाळूचा ट्रॅक्टर | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vanoli villagers grabbed the sand tractor & handover it to Police

...शेवटी ग्रामस्थांनीच पकडून दिला वाळूचा ट्रॅक्टर | Nashik

वनोली (जि. नाशिक) : येथे काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी वाळूचा ट्रॅक्टर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. यामुळे परिसरातील वाळू माफियांचे (Valu Mafia) धाबे दणाणले आहे. महसूल विभागाच्या व पोलिस यंत्रणेच्या नाका खालून या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी (Valu Chori) होते. याबाबत संबंधित यंत्रणांना माहिती असून देखील सर्रासपणे डोळेझाक केली जात असल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: सर्पदंश झालेल्या महिलेचा अंधश्रद्धेने घेतला बळी; उपचाराअभावी मृत्यू

स्वयंघोषित पुढारी वाळू चोरीत सक्रिय

वनोली गावातील काही तरुणांनी (Youth) रात्रीचा जागता पहारा देऊन काल अखेर एक ट्रॅक्टर पोलिसांच्या हवाली केला. वनोली गावाच्या परिसरातून कान्हेरी नदी वाहते. या नदीतून मोठ्या प्रमाणात 'गौण खनिज' म्हणजेच वाळूची चोरी होत आहे. यामुळे नदीपात्रातील विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. महसूल खात्याशी लागेबांधे असलेले स्वयंघोषित पुढारी या वाळू चोरीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सर्रासपणे हा व्यवसाय सुरू असतो.

हेही वाचा: गांधील माशी चावल्याने पोलिसाचा मृत्यू; दिंडोरी पोलिस ठाण्यातील घटना