वणी- लखमापूर- वरखेडा येथे अपघातातील जखमीच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या व त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका चालकावर निलंबनाची कारवाई होऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीला दोन महिने उलटूनही संबंधितांवर कोणताही कारवाई न झाल्याने मृताच्या मुलाने वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात जात तेथे आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्याला परावृत्त केले.