फोटो ओळ....09860
बोर्डी (जि. पालघर) : राज्यस्तरीय अधिवेशनात वर्षा देवरे यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.
----------------
मुख्याध्यापिका वर्षा देवरे यांना
राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार
म्हसदी, ता. १९ : शैक्षणिक क्षेत्रात ज्ञान, कर्तृत्व, समर्पित सेवाभाव, प्रभावी नेतृत्वाने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या येथील श्री धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित गंगामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा नरेंद्र देवरे यांना मुंबई येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेतर्फे बोर्डी (ता. डहाणू, जि. पालघर) येथे झालेल्या ६५ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माने, धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय पवार, सचिव उदय तोरवणे उपस्थित होते. मुख्याध्यापिका वर्षा देवरे, प्राचार्य नरेंद्र देवरे यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रशिस्तपत्र, सन्मानचिन्ह, स्नेह वस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
वर्षा देवरे यांनी मुख्याध्यापिका म्हणून कार्य करताना विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थिनीला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, तिच्यात आत्मविश्वास, स्वावलंबन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्यांची रुजवण व्हावी, यासाठी प्रयत्न केले. पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, संचालक मंडळ व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.