जिल्हा- शहर टुडेला वापरावी
-----
NSK26H35167
एरंडोल : तालुक्यातील वनकोठे येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगार पुत्रांचे स्मेहमिलन नुकतेच पार पडले, त्यात सहभागी मित्र.
----
तीन दशकांच्या आठवणी, बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!
उपशीर्षक
कासोद्याच्या वसंत कारखाना कॉलनीतील मित्रांचे स्नेहमिलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : दिवाळी म्हटली की दिव्यांची आरास आणि फराळाचा सुगंध, पण यंदाची दिवाळी वसंत सहकारी साखर कारखाना, वनकोठे - वसाकाच्या परिवारासाठी वेगळीच ठरली. सन १९७७ ते २००८ या कालावधीतील जवळपास १५० मित्र एकाच छताखाली आले आणि दोन दिवसांचा हा ‘वसाका कामगार पुत्र स्नेह मेळावा’ खऱ्या अर्थाने आठवणींचा महाउत्सव ठरला.
मेळाव्यात पाचोऱ्याचे प्रा. नितीन (रिंकू) यशवंतराव पाटील यांनी या वेळी वसाका फाउंडेशन स्थापन करून एकामेकाला मदतीचा हात देण्याची तसेच कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत मित्रांचे नेटवर्क वापरून प्रयत्न करण्याची कल्पना मांडली.
१४-१
गुरुजनांप्रती कृतज्ञता
कारखाना साईटवर चटईच्या खोलीत भरणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील आदरणीय गुरुजन श्री. वानखेडे, श्री. सौंदाणे, श्री. भोई, श्री. साबळे, शांताराम गुरुजी यांच्या निष्ठावान विद्यादानाप्रति कृतज्ञपूर्वक भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या गुरुजनांनी घडविलेल्या दोन पिढ्यातील अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदांवर चमकदार कामगिरी करत आहेत.
चौकट
दोन- तीन दशकांनंतर भेट
या मिलन समारंभात कुणी २० वर्षांनी, तर कुणी तब्बल ३० वर्षांनी एकमेकांना भेटत होते. बालपणाच्या खेळकर गप्पा, खोडकर किस्से, पुन्हा एकत्र येणे, या सगळ्यांनी दोन दिवस कसे निघून गेले, हेच कळले नाही. युवा उत्साही सहकारी चेतन पाटील, यशराज पाटील, नागेश्वर पाटील, दीपक चौधरी, नितीन देशमुख, यतीश पाटील, हेमंत पाटील यांनी कार्यक्रम आयोजन व यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. यावेळी सर्व मित्रांनी एकत्र क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतला.
-------