कळवण- कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव या तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्रीऐवजी वार्षिक भाडे तत्त्वावर चालविण्याबाबत शासन निर्णय घेतलेला असतानाही, राज्य सहकारी बँकेने विक्री प्रक्रिया सुरू केल्याने या प्रकरणात संशय निर्माण झाला आहे. या प्रक्रियेमागे मोठे आर्थिक षड्यंत्र असल्याचा आरोप कारखाना बचाव समितीचे निमंत्रक सुनील देवरे यांनी केला आहे.