कळवण- कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव तालुक्यांच्या कार्यक्षेत्रातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे जप्त आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC), दिल्लीमार्फत २० ऑगस्टला ऑनलाइन विक्री प्रक्रिया सुरू करण्यात येत असून, ही बाब गंभीर असल्याचे मत ‘वसाका’ बचाव समितीचे अध्यक्ष सुनील देवरे यांनी व्यक्त केले.