वसुबारस भक्तिमय वातावरणात साजरी; गोमातेचे पूजन करून दिवाळीचा शुभारंभ

वसुबारस भक्तिमय वातावरणात साजरी; गोमातेचे पूजन करून दिवाळीचा शुभारंभ
Published on: 
ॲंकर NSK26H34554 जळगाव : वसुबारसनिमित्त पांझरापोळ संस्थानमध्ये गाय आणि वासराची पूजा करताना महिला. --- गोमातेची पूजा, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना दीपोत्सवास प्रारंभ; वसुबारस भक्तिमय वातावरणात उत्साहात सकाळ वृत्तसेवा जळगाव,ता.५ : दीपावलीच्या पहिल्या दिवसाचे प्रतीक असलेली वसुबारस शहरात गुरुवारी (ता. ५) पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील विविध भागांत गोमातेचे पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. महिलांनी गोमातेची विधिवत पूजा, आरती करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. वसुबारस हा दिवाळी सणाचा पहिला दिवस मानला जातो. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचे स्थान असून, तिच्यात ३३ कोटी देवतांचा वास असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी गायीला स्नान घालून तिचे शृंगार करण्यात येते. तसेच हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजन केले जाते. गायीला गोडधोड पदार्थ आणि चारा खाऊ घालून तिची आरती केली जाते. शहरातील पार्वतीनगर येथील गौराई महिला मंडळाच्या वतीनेही वसुबारसनिमित्त गोपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशांत पाटील यांच्या निवासस्थानी महिलांनी एकत्र येत गोमातेचे विधिवत पूजन केले. यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने आरती करून वसुबारस साजरी केली. या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. वसुबारसच्या पूजनानंतर दिवाळीच्या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, पुढील काही दिवस शहरात धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज असे विविध सण उत्साहात साजरे केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.