नाशिक- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ राज्यातील सहा लाख ७१ हजार ज्येष्ठ नागरिकांना मिळाला आहे. .वयवर्षे ६५ व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदत म्हणून एकवेळ एकरकमी रुपये तीन हजार त्यांच्या बचत खात्यात थेट वितरण करण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात आली..ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने /उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच त्यांचे मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपयांच्या मदतीची ही योजना आहे. पात्र लाभार्थींना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड ,स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेक्स, लंबर बेल्ट, सर्व्हायकल कॉलर खरेदी करता येणार आहे..त्रुटी दूर केल्यानंतर लाभ मिळणारराज्यभरातून २० लाख ७६ हजार ८३० अर्ज या योजनेसाठी दाखल झाले. यापैकी १६ लाख ८० हजार ६६९ छाननीनंतर योजनेसाठी पात्र ठरले. यापैकी ६ लाख ७१ हजार ५९६ ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला. उर्वरित पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या केवायसी तसेच नोंदणीकृत क्रमांक संदर्भातील त्रुटी दूर झाल्यानंतर त्यांनाही लाभ मिळणार आहे.ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व पाहणी घरोघरी जाऊन करण्यात येते. सर्वेक्षणाबरोबरच या योजनेचा लाभार्थींची तपासणी करण्यात येणार आहे..Nagpur News: दुचाकीला धडक देऊन मद्यधुंद डॉक्टर तरुणीची मुजोरी, रस्त्यात गोंधळ | Video Viral.महानगरपालिकास्तरावर आयुक्त महानगरपालिका व सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण /जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची समिती मार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत ६५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे..ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.उर्वरित पात्र ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे.-ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, समाज कल्याण विभाग.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.