नाशिक- नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे घेण्यात आलेल्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई) मेन्स परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. १९) उशिरा जाहीर झाला. परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरीची नोंद करताना चांगले गुण मिळवत आयआयटी संस्था प्रवेशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. वेदांत भट याने ९९.९८९ पर्सेंटाईल मिळविताना राष्ट्रीय क्रमवारीत २२६ वा क्रमांक मिळविला. इतरही विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाले.