शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांची घोषणा

शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांची घोषणा
Published on: 
वेदविद्या प्रतिष्ठान शृंगेरी शारदा पीठाच्या छायेत शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांची घोषणा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : पंचवटी परिसरातील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान (वेदविद्या भवन गुरुकुल) आता जगप्रसिद्ध आदी शंकराचार्य परंपरेच्या दक्षिणायम्नाय श्री शृंगेरी शारदा पीठ (कर्नाटक) या सर्वोच्च पीठाच्या वतीने थेट संचलित केले जाणार आहे. या ऐतिहासिक आध्यात्मिक संलग्नीकरणाची घोषणा शृंगेरी पीठाचे शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी वेदपाठ शाळेतील उपस्थितीत केली. २४ वर्षे शुक्ल यजुर्वेद विद्वान वेदमूर्ती वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे गुरुकुल ऋषिकुमारांना शंभर टक्के मोफत वेद शिक्षण देत आहे. गुरुकुलाचा हा निःस्वार्थी आलेख आणि अथांग वेदसेवा पाहून शृंगेरी शारदा पीठाने या गुरुकुलाला दत्तक घेऊन आपल्या छायेत संचालित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २ नोव्हेंबरला झालेल्या या मंगलमयी सोहळ्याची सुरुवात ऋषिकुमारांच्या वेदमंत्रोच्चाराने झाली. याप्रसंगी गुरुकुलातील रवींद्र पैठणे गुरुजी यांनी सपत्नीक शंकराचार्यांचे पाद्यपूजन करून शुभाशीर्वाद घेतले. या वेळी शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महास्वामी म्हणाले की, नाशिकची पंचवटी ही प्रभू श्रीरामांच्या चरणांनी पावन झालेली तपोभूमी आहे. या भूमीवर वैदिक सम्राट श्रीकृष्णशास्त्री गोडसे गुरुजी यांचा जन्म शताब्दी महोत्सवाच्या निमित्त ही घोषणा म्हणजे त्यांना श्रद्धांजली ठरेल. या सोहळ्याला शृंगेरी जगद्गुरू शंकराचार्य शारदा पीठाचे सीईओ श्री. पी. मुरली, श्रीराम गोपाल अय्यर, जयंत भातंबरेकर, श्रीकृष्ण कुमार राव, अध्यापक वेदमूर्ती गोविंद पैठणे, सौरभ पाठक तसेच नाशिकमधील विविध धार्मिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह पैठणे परिवार आणि नाशिककर भाविक उपस्थित होते. ---कोट शृंगेरी पीठाने गुरुकुलाचे संचालन स्वतःच्या हाती घेणे, हा वैदिक सम्राट श्रीकृष्णशास्त्री गोडसे गुरुजींच्या तपाचा आणि बटूंच्या निःस्वार्थी वेदपठणाचा सर्वोच्च सन्मान आहे. आता शृंगेरी पीठाच्या जागतिक अधिकाराखाली आमचे विद्यार्थी अधिक सक्षमपणे संपूर्ण देशात आणि जगभरात सनातन वैदिक धर्माचा ध्वज फडकवतील. -वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.