आम्ही साऱ्या जआम्ही साऱ्या जणी---लोगोणी---लोगो

आम्ही साऱ्या जआम्ही साऱ्या जणी---लोगोणी---लोगो
Published on: 
टुडे चार : मेन फिचर --- NSK26H32658 जळगाव : ‘सकाळ’च्या ‘आम्ही साऱ्याजणी’ उपक्रमात वीरती वृंद ग्रुपमधील महिला पदाधिकारी व सदस्या. --- लोगो : आम्ही साऱ्या जणी सामाजिक क्षेत्र ----------- शीर्षक अहिंसेची शिकवण, संस्कार नव्या पिढीला देण्याचा ध्यास उपशीर्षक वीरती वृंद महिला मंडळाचा ‘नई सोच, नई दिशा’ या संकल्पनेसह विविध उपक्रमांतून सेवाभाव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : समाजातील शिकवण आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत रुजविण्यासह मुलांमध्ये लहानपणापासून अध्यात्माची गोडी निर्माण करणे, त्यांच्या उपजत गुणांना व्यासपीठ मिळवून देणे, महिला व युवतींना सक्षम बनविणे, यासाठी वीरती वृंद महिला मंडळ कार्यरत आहे. गरजूंना मदत, वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करणे व फराळवाटप असे उपक्रम वर्षभर राबविले जातात. अहिंसा’ आणि रात्री भोजन त्याग’ हे जैन धर्माचे मूलतत्त्व आहेत, त्यावर आमचे कार्य सुरू असते, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’च्या ‘आम्ही साऱ्या जणी’ उपक्रमात दिली. -------- संस्कारातून सक्षमीकरण प्रीती हितेंद्र दोशी (अध्यक्षा, वीरती वृंद ग्रुप, जळगाव) : जैन समाजातील चारही संप्रदायांतील महिला वीरती वृंद ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. २०२२ मध्ये आचार्य रत्नसुंदरसूरीश्वर म. सा. यांच्या आदेशानुसार मंडळाची स्थापना झाली. सामाजिक कार्यासह शिक्षणावर भर दिला जातो. महिला, युवती व युवकांतील कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणे, त्यांना ‘जीवन जिने की कला’ शिकविणे, तसेच जैन मंदिरांची व्यवस्था सांभाळणे, अशी कामे मंडळ करते. ‘नई सोच, नई दिशा’ या संकल्पनेतून नवनवीन उपक्रम राबविले जातात. ---- शैक्षणिक सुविधा रूपाली शाह : वीरती वृंद ग्रुपतर्फे केवळ जैन समाजातीलच नव्हे, तर इतर समाजांतील युवती व विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठीही प्रयत्न केले जातात. जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ यंत्रणा आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांचे जीवन सुकर व्हावे, हा या उपक्रमांचा उद्देश आहे. ------- विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन उपक्रम चेतना दोशी : आम्ही महिला एकत्र येऊन सामाजिक आणि धार्मिक कार्य करतो. कुटुंबीयांकडूनही या कार्याला चांगला प्रतिसाद मिळतो. धर्मासाठी योगदान देता येते, याचा अभिमान वाटतो. विद्यार्थी, युवक आणि युवतींसाठी विविध ऑनलाइन उपक्रम राबविले जातात. यातून समाजाला काहीतरी शिकवण देता येते, याचे समाधान वाटते. ---- वृद्धाश्रमात दिवाळीचा आनंद सोनल गांधी : वीरती वृंद ग्रुपतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी दिवाळीत वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि बेघर निवासस्थानी जाऊन ज्येष्ठांशी संवाद साधतो. त्यांना दिवाळीचा फराळ वाटप करून सणाचा आनंद वाटून घेतो. ---- समाजसेवेची संधी कोमल गांधी : जैन समाजातील महिलांनी, विशेषतः सुनांनी, स्वतःच्या विकासासोबत समाजाच्या प्रगतीसाठीही पुढाकार घ्यावा. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा आणि विवाहानंतर केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न राहता समाजसेवेची संधी मिळावी, या उद्देशाने वीरती वृंद ग्रुपची स्थापना झाली आहे. --- संस्कारांतून मनोरंजन कार्तिकी शाह : मुंबईत झालेल्या जैन समाजाच्या कार्निव्हलची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्याची संधी मिळाली. लहान मुलांच्या बुद्धीला चालना देणारे खेळ, तसेच धार्मिक विषयांवरील प्रश्नमंजूषा आयोजित केल्या होत्या. मनोरंजनासोबत धर्म, संस्कृती आणि जीवनातील ध्येयांची माहिती देण्यात आली. या उपक्रमातून जैन समाजातील चारही संप्रदाय एकत्र आले. --------- पाठशाळेतून संस्कृतीचे संवर्धन रजनी बोरा : जैन धर्म आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी मुलांसाठी धार्मिक पाठशाळा सुरू आहे. यात ६३ मुलांनी सहभाग घेतला आहे. मुलींसाठी स्वतंत्र विंगही स्थापन केली आहे. यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे. --- चौकटीत अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया वीरती वृंद ग्रुपच्या महिला पदाधिकारी शीतल शाह, चैताली दोशी, पूजा गांधी, मीनल नानेशा यांनी दिल्या. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com