Vegetable Market
sakal
नाशिक: थंडीची लहर कमी होताच भाजीपाल्याच्या बाजारभावाने पुन्हा उसळी घेतली आहे. पालेभाज्या चढ्या भावाने विकल्या जात असून, फळभाज्यादेखील काहीशा प्रमाणात महाग झाल्या आहेत. साधारणतः पाच ते दहा रुपयांनी भाव वाढलेला आहे. गवारीच्या शेंगा अद्याप पावकिलोला ६५ ते ७५ रुपये असून, टोमॅटोची आवकच कमी असल्याने ८० रुपये किलो भाव स्थिर आहे. या आठवड्यात शेवगा पुन्हा महागला असून, ३५० ते ४०० रुपये किलो भाव सुरू आहे.