Kalidas Kalamandir
sakal
जुने नाशिक: भरधाव वाहन चालवीत एका चालकाने थेट कालिदास कलामंदिराचे प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला. या धडकेत प्रवेशद्वारावर नियुक्तीस असलेले सुरक्षारक्षक ज्ञानेश्वर ताजनपुरे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी (ता. ९) रात्री अकराला ही घटना घडली.