
नाशिक : बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांना उचलून दंड आकारणी करण्यासाठी खासगी संस्थेला ठेका देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. त्यासाठी करारनामा करण्याचे काम सुरु असून, पोलिस आयुक्तांनी शहरातील नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. (vehicle park at no parking zone have to pay penalty)
टोईंग लिलाव प्रक्रिया मार्गी
वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबरच सुरळीत वाहतुकीसाठी अनेक दिवसांपासून रखडलेला टोईंग(Towing) लिलाव प्रक्रिया मार्गी लागली आहे. ई- टेंडर(E-tender) प्रक्रियेत कमी दरपत्रक सादर करणाऱ्या ठेकेदारास नो पार्किंग झोनमधील(No parking zone) वाहने क्रशिंग करण्याचा ठेका पोलिस प्रशासनाने निश्चित केला आहे. याबाबत निवेदाकार आणि पोलिस यांच्यात प्रारूप तत्त्वावर करार होणार आहे. त्याबाबत काही तक्रारी असल्यास अथवा सूचना असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ठेकेदाराच्या तक्रारी आयुक्तांकडे करा
रस्त्यात लावलेली वाहन उचलण्यासाठी खासगी ठेकेदारांमार्फत वाहन उचलून दंड आकारून संबंधित वाहनांवर कारवाई केली जाते. काही दिवसांपासून वाहन उचलण्याचे काम बंद आहे. ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांच्या वाहन उचलण्याच्या कामाबाबत नागरिकांच्या कायमच तक्रारी होत्या. त्यामुळेच आता पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी क्रेनने(Crane) रस्त्यातील बेशिस्त वाहन उचलण्याच्या खासगी कराराबाबत थेट नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविल्या आहे. त्यासाठी हा करार पोलिसांनी सार्वजनिक केला आहे. पोलिसांनी वाहन उचलण्याचा ठेका दिलेल्या जुन्या ठेकेदाराच्या संस्थेशीच हा करार केला असून त्याविषयीचे पूर्वानुभव व तक्रारी नागरिकांना पोलिस आयुक्तांकडे नोंदविण्याची मात्र प्रथमच संधी मिळाली आहे. करारात साधारण ३२ अटी शर्ती असून त्यात, शासकीय वाहन(GOVT vehicle) अत्यावश्यक सेवेतील(essential services) वाहन बेशिस्त पार्किंगमध्ये असल्यास त्याविषयी मात्र काहीही नियम नाही.
करारातील अटी
- पाचवेळा अलाऊंस करूनच वाहन उचलायचे
- गैरवर्तणुकीच्या तक्रारी आल्यास ठेकेदारावर कारवाई
- वाहन उचलणाऱ्यांनी निळ्या रंगाचा गणवेश
- पावती बुक ठेकेदाराचेच पण मान्यता पोलिसांची
- सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळेत काम चालणार
- उचलताना नुकसान झाल्यास ठेकेदाराकडून भरपाई
वाहनाचा प्रकार जीएसटी तडजोड शुल्क भरावे लागणार
दुचाकी वाहन (सर्व प्रकारची ) ९० २०० २९०
तीन चाकी वाहनांसाठी ०१ २०० २०१
चार चाकी वाहनांसाठी ३५० २०० ५५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.