वाहनरुपी लक्ष्मी आणली घरी..!

वाहनरुपी लक्ष्मी आणली घरी..!
Published on: 
मेन -- फोटो : H34749 ---------- वाहनरुपी लक्ष्मी आली घरी..! ऑटोमोबाईलमध्ये तेजी; ग्राहकांवर योजनांचा वर्षाव सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : दीपोत्‍सवाचा उत्‍साह वृद्धींगत होत असताना, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत वाहनरुपी लक्ष्मी अनेकांनी घरी आणली. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत ऑक्‍टोबर महिन्‍यात वाहन खरेदीतील घसरण भरून काढताना ऑटोमोबाईल क्षेत्रात तेजी दिसली. कंपन्‍यांमध्ये वाढती स्‍पर्धा लक्षात घेता, ग्राहकांवर योजनांचा वर्षाव करण्यात आला. गेल्‍या वर्षी नवरात्रोत्‍सव- दसरा आणि दिवाळी असे दोन मोठे सण ऑक्‍टोबर महिन्‍यात आले होते. त्यामुळे वाहन खरेदीच्‍या आकडेवारीचा आलेख उंचावला होता. दी फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्सतर्फे अध्यक्ष सचिन महाजन यांनी दिलेल्‍या आकडेवारीनुसार, गेल्‍या वर्षी ऑक्‍टोबरच्‍या तुलनेत वाहन खरेदीमध्ये सुमारे १७ टक्‍के घसरण झाली आहे. परंतु ईव्‍ही वाहनांचा एकूण विक्रीतील हिश्शामध्ये मोठी वाढ झाली असून, सुमारे ११ टक्‍के वाहने ईव्‍ही होती. ऑक्‍टोबर महिन्‍यात विक्रीतील दिसणारी घसरण भरून काढतांना, दिवाळीच्‍या पर्वावर लक्ष्मीपूजनाच्‍या दिवशी रविवारी (ता. ८) वाहन खरेदीचा मुहूर्त साधला गेला. सायंकाळी उशिरापर्यंत खरेदीचा ओघ सुरु होता. यामुळे ग्राहकांच्‍या गर्दीने कंपन्‍यांची दालने गजबजली होती. ---चौकट ज्‍याची बुकींग, त्‍याला वाहन मागणी असलेल्या वाहनांच्‍या काही मॉडेल्‍सची उपलब्‍धता या सणाच्‍या मुहूर्तावर करुन देण्यात आली. परंतु तीन ते चार महिन्‍यांपूर्वी बुकिंग केलेल्‍या ग्राहकांनाच हा मुहूर्त साधता आला. व ऐनवेळी खरेदीसाठी दालनात आलेल्‍या ग्राहकांना रिकाम्‍या हाती घरी परतावे लागले. ---चौकट खरेदीचा ओघ सुरुच राहणार लक्ष्मीपूजनानिमित्त खरेदीचा उत्‍साह बघायला मिळाला असताना, मंगळवारी (ता.१०) दिवाळी पाडव्‍याच्‍या दिवशीदेखील हाच खरेदीचा ओघ सुरु राहणार असल्‍याचा व्‍यावसायिकांचा अंदाज आहे. त्यामुळे या हंगामात सुमारे दोन हजार दुचाकी तर तीनशे ते पाचशे चारचाकी वाहने विक्री होण्याचा अंदाज आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.