Vehicle Theft
sakal
नाशिक: शहरात एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गेल्या दोन दिवसात प्रवासी रिक्षासह तब्बल १३ दुचाकी वाहने चोरीस गेल्याचे गुन्हा दाखल झाले आहेत. चोरट्यांनी सुमारे ३ लाख ७४ हजारांची वाहने चोरून नेली आहेत. वाहन चोरट्यांचा वाढता सुळसुळाटामुळे वाहनधारक हवालदिल झाले आहेत. चोरट्यांकडून सार्वजनिक ठिकाणातील वाहनतळे लक्ष केली जात आहेत.