Crime
sakal
जुने नाशिक: नानावली येथील प्रज्ञा नगर भागात पाच वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला होता. या घटनेत सहभाग असलेल्या तिघा संशयित यांना भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. तर इतर दोघे संशयित फरार आहेत. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा संशयित यांची पोलिसांनी जुने नाशिक परिसरातून धिंड काढण्यात आली.