Nashik News : भररस्त्यात थांबविली जातात वाहने; दिंडोरी नाका परिसरात बेशिस्त वाहतूक

vehicles are stopped on the road like this.
vehicles are stopped on the road like this.esakal

Nashik News : दिंडोरी नाका परिसरात बेशिस्तीने वाहने रस्त्यावरच थांबविली जात असल्यामुळे इतर वाहनांना त्यांचा अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे.

या वाहनांना शिस्त लावण्यासाठी या भागात वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी फिरकत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अरुंद रस्त्यावर प्रवासी घेण्यासाठी थांबलेल्या वाहनांच्या रांगा रस्त्याच्या अर्धेअधिक भागापर्यंत पोचत असल्याने ही समस्या वाढत आहे. (Vehicles are stopped in Bharat Unruly traffic in Dindori Naka area Nashik News)

दिंडोरी नाक्याच्या या भागात पंचवटी कारंजा, निमाणी, पेठ रोड या मार्गाने वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यात बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारी शेतमालाच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते.

या भागात दिंडोरी, वणी आदी परिसराकडे जाणाऱ्या काळ्या- पिवळ्या टॅक्सी थांबलेल्या असतात. याच भागात बसथांबा आहे. तसेच रिक्षांचाही थांबा येथेच असल्यामुळे वाहनांची प्रचंड गर्दी होत असते.

अशा या वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यानंतर ती वाहने रस्त्याच्या अर्ध्याअधिक भागापर्यंत थांबतात, त्यावेळी मागून येणाऱ्या वाहनांची कोंडी होऊन ही कोंडी चौकापर्यंतच्या भागात पोहचते. त्यामुळे इतर वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना त्याचा त्रास होतो.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

vehicles are stopped on the road like this.
Nashik News : तुकडाबंदी दस्त नोंदणी पुनर्विलोकन याचिका फेटाळली

दिंडोरी नाक्यावरील वर्दळ लक्षात येऊन येथील वाहनचालकांना शिस्त लावण्याची गरज भासत आहे. निमाणीच्या बाजूला या नाक्यावरच्या भागात वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी थांबलेले असतात, असे असताना ज्या भागात रिक्षा, बस आणि टॅक्सी या वाहनांचे थांबे एकाच ठिकाणी आहे.

तेथील गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कोणताच प्रयत्न होत नसल्याचे चित्र येथे दिसत असल्याने त्याचा त्रास इतरांना सहन करण्याची वेळ येत आहे. या भागात थांबणाऱ्या वाहनांना शिस्त लावण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

vehicles are stopped on the road like this.
MSRTC Discount : जिल्ह्यात 21 लाख महिलांनी केला सवलतीच्या दरात प्रवास; कळवण डेपो अव्वल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com