esakal | जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे निधन

बोलून बातमी शोधा

vasant hudalikar
जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे निधन
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक (freedom fighter) आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वसंतराव हुदलीकर (vasant hudalikar death ) यांचे आज (ता.5) पहाटे 4 वाजेच्या सुमारास निधन झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो मुलांचे भवितव्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सीबीएस जवळील हुतात्मा स्मारक हे त्यांच्यामुळेच पुरोगामी चळवळीचे केंद्र बनले होते. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे वसंतराव हे अखेर पर्यंत सामाजिक कार्यात (social work) सक्रिय होते. (vasant hudalikar passes away nashik marathi news)

हेही वाचा: आरोग्य सांभाळा! नाशिकमध्ये चालता-बोलता होतायेत मृत्यू

छगन भुजबळ यांच्या कडून श्रध्दांजली

''ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे आज वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. अत्यंत दुःख झाले. मुळचे समाजवादी पक्षाचे असलेले वसंतराव हुदलीकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक देशातील अनेक महत्त्वाच्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील हुतात्मा स्मारकाचे ते सर्वेसर्वा होते. याठिकाणी खेड्या पाड्यातील विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुरुकुलासारखे सांभाळत होते. तसेच शहीद कुटुंबातील सदस्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा त्यांचा पुढाकार होता. महात्मा गांधीच्या विचारांची जोपासना करत आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी खर्ची केले. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ समाजसेवकाला नाशिककर कायमचे मुकले आहे. त्यांच्या निधनाने हुदलीकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय हुदलीकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.''

- छगन भुजबळ, मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा