दुसऱ्या डोसासाठी ज्येष्ठांची वणवण! लसीकरण केंद्रांवर विदारक स्थिती

लस कधी येणार व वयोगटानुसार आतापर्यंतची आकडेवारी बाबत दस्तुरखुद्द मनपा वैद्यकीय अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले
vaccination in nashik
vaccination in nashike-sakal

सिडको : लस(vaccine) कधी येणार व वयोगटानुसार आतापर्यंतची आकडेवारी बाबत दस्तुरखुद्द मनपा वैद्यकीय अधिकारीच (medical officer) अनभिज्ञ असल्याचे दिसून आल्याने सिडकोचा सर्व कारभार रामभरोसे सुरू असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. (Officials are unaware of vaccination planning) सुरवातीचा डोस संपून त्यावर आता बरेच दिवस होऊनही दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठ नागरिकांना(Senior citizen) वणवण फिरावे लागत असल्याचे विदारक चित्र सुरू येथील लसीकरण केंद्रावर बघायला मिळत आहे.(Veterans are struggling for second dose of covid vaccine Nashik)

vaccination in nashik
नाशिक जिल्ह्यात टँकरद्वारे ९६ टन ऑक्‍सिजनचा पुरवठा

लसीकरणाला नियोजनाचा अभाव

दुसरीकडे वैद्यकीय विभागाकडून ऑनलाइन (online) रजिस्टर करण्यासाठी अट्टहास धरण्यात येत आहे. असे असताना ऑनलाइन रजिस्टरला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना आता या ज्येष्ठ व तरुण वर्गाला सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठांपर्यंत तक्रारी करूनही नियोजनाचा अभाव वारंवार दिसून येत आहे. त्यातच वयोगटानुसार कोणत्या वर्गातील नागरिकांना किती लसीकरण झाले, याबाबत दस्तुरखुद्द मोरवाडी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवीन बाजी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

''सिडको विभागात आतापर्यंत २३, ०३४ इतक्या लोकांना लसीकरण केले आहे. वयोगटानुसार लसीकरणाची माहिती आता उपलब्ध नाही. लस कधी उपलब्ध होईल याची माहिती नाही.''

- डॉ. नवीन बाजी, वैद्यकीय अधीक्षक, मोरवाडी रुग्णालय, मनपा, सिडको, नाशिक.

vaccination in nashik
दोनशे लसींसाठी भरली पाचशेवर नागरिकांची जत्रा!

''माझ्या पतींना मधुमेह(Diabetes) असून पहिली लस देऊन तीन महिने झाले आहे. तरीदेखील उपलब्ध होत नाही. काही दिवसांपासून वणवण भटकत आहे. आमदार, खासदार, पालकमंत्री आता कोठे गेले. ज्येष्ठ नागरिकांना लस घरपोच असली पाहिजे.''

-विजया बोरसे, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com