NSK26H33092
जळगाव : नेहरु चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त मंगळवारी ध्वज व शस्त्रपूजन विधी उत्साहात पार पडला, त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर.
------
नेहरु चौक मित्र मंडळातर्फे
शस्त्रपूजन विधी उत्साहात
उपशीर्षक
मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : नेहरू चौक मित्र मंडळातर्फे मंगळवारी (ता.२०) विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्रपूजन व ध्वजपूजन सोहळा उत्साहात आणि विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
शस्त्रपूजन परंपरेचे मंडळाचे हे यंदाचे ४३ वे वर्षे होते. सुरुवातीला ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात मान्यवरांच्या हस्ते विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी ध्वजस्तंभाचे पूजन करून उपस्थितांना व परस्परांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. विजयादशमीनिमित्त ही ऐतिहासिक परंपरा सातत्याने जोपासण्याचे कौतुकास्पद काम केल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांचे विशेष आभार मानले व कौतुक केले.
या सोहळ्यास खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे (उर्फ राजूमामा), महापौर दीपमाला काळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी विजय मोघे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक सागर सोनवणे, जळगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, केशव स्मृती समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, ॲड. विपिन पाटील, दिलीप गांधी, शैलेश ठाकरे, संदीप रडे, अतुल हाडा आणि नेहरू चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
----------