
Nashik Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेच्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या १३ माजी नगरसेवकांनी एकत्र होत विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात उभारलेल्या बंडाचा आज दुसरा अध्याय पाहायला मिळाला.
नाशिक पश्चिम मतदारसंघातून इच्छुक असलेल्या माजी नगरसेवकांनी पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांची भेट घेत कोणालाही उमेदवारी द्या, मात्र विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊ नका अशी आग्रही मागणी करीत शहराध्यक्षांच्या दालनात ठिय्या मांडला. हिरे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास जागा हातची जाईल, असा इशाराही देत तीव्र बंडखोरीचे संकेत दिले. (no Seema Hire displeasure of BJP in nashik West)