फोटो विदित गुजराथीचा
३०-२
अर्जुन पुरस्कारप्राप्त विदितचा
नाशिकमध्ये होणार सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ ः आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू, ग्रँडमास्टर विदित गुजराथी याला शुक्रवारी (ता.१३) नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित ''अर्जुन पुरस्कार'' प्रदान करण्यात आला. विदितचा हा पुरस्कार जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. विदितच्या सन्मानार्थ लवकरच नाशिकमध्ये सत्कार समारंभ आयोजित केला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, की हा पुरस्कार म्हणजे नाशिकच्या संपूर्ण क्रीडा व्यवस्थेचा, म्हणजेच शिक्षक, प्रशिक्षक, पालक आणि खेळाडूंच्या परिश्रमाचा सन्मान असल्याचे सांगितले. नाशिकमधून भविष्यात असेच अनेक चॅम्पियन्स घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही विदितचे अभिनंदन करत शालेय स्तरावरील क्रीडा प्रोत्साहनाचे महत्त्व अधोरेखित केले. केंद्र सरकारच्या ''खेलो इंडिया'' उपक्रमासोबत काम करत महाराष्ट्राचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा, निवडक राष्ट्रीय खेळाडूंना ८ वर्षांसाठी वार्षिक ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती, शाळांमधील क्रीडा पायाभूत सुविधांसाठी १०० टक्के केंद्रीय अनुदान आणि ''खेलो इंडिया'' पदक विजेत्यांना अनुक्रमे ५ लाख, ३ लाख व २ लाख रुपयांची राज्यस्तरीय रोख पारितोषिके देऊन तरुण खेळाडूंना घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विदितचे अभिनंदन करत नाशिकचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर उंचावल्याचे गौरवोद्गार काढले.
------------