पान-३
२६९७८
येवला : जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत उपविजेते पद पटकावलेले विद्या इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी.
------------
३०-२
विद्या इंटरनॅशनल स्कूलला
नेटबॉलचे दुहेरी उपविजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.२ : जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत विद्या इंटरनॅशनल स्कूलने दुहेरी उपविजेतेपदाची कामगिरी बजावली.
विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद पटकावले.
उपांत्यपूर्व सामन्यात विद्या इंटरनॅशनलच्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर ४–१ अशी दमदार मात करत पुढील फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात देवळाली हायस्कूलच्या संघाविरुद्ध विद्या इंटरनॅशनलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने प्रथमच जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवत थेट अंतिम फेरी गाठली आणि उपविजेतेपद मिळवून पदार्पणाची शानदार नोंद केली. पुढील वर्षी अधिक जोमाने, नियोजनबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर पुन्हा जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन विजेतेपद मिळविण्याचा निर्धार खेळाडूंनी केला आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल, डॉ. संगीता पटेल, प्राचार्य सौ. शुभांगी शिंदे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संघाला क्रीडाशिक्षक किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
------------------