पारंपरिक वेशभूषा,संगीताचा ठेका अन् आई-मुलीचा दांडिया!

पारंपरिक वेशभूषा,संगीताचा ठेका अन् आई-मुलीचा दांडिया!
Published on: 
YEO26B27262 येवला : विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये दांडिया उत्सवात सहभागी विद्यार्थिनी व पालक. ------------- संगीताच्या ठेक्यावर आई- मुलींचा दांडिया ----------- संस्कृतीच्या तालावर थिरकले चिमुकले; विद्या इंटरनॅशनलमध्ये रंगला उत्सव ------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२० : पारंपरिक वेशभूषेचा साज, दांडियाच्या तालावर थिरकणारी पावले आणि पालक- पाल्यांच्या उत्साहाने फुललेले आनंदाचे रंग... अशा उत्साहपूर्ण वातावरणात विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये दांडिया उत्सव रंगला. भारतीय संस्कृती आणि परंपरांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवतानाच पालक व विद्यार्थ्यांमधील स्नेहबंध अधिक दृढ करणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगीताच्या ठेक्यावर पारंपारिक वेशभूषा करून आई व मुलीने एकाच वेळी दांडीयावर धरलेला ठेका..हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. ----------- कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश पटेल व संचालिका डॉ. संगीता पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधत असतानाच त्यांना आपल्या संस्कृती आणि सण- उत्सवांची ओळख व्हावी व पालक-पाल्यांमधील संवाद वाढावा यासाठी शाळा सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते, असे डॉ. पटेल यांनी सांगितले. नालेश्री गुजराती व तोरल पटेल यांनी परीक्षण केले. मुख्याध्यापिका शुभांगी शिंदे यांनी स्वागत केले. स्पर्धेत विहा जगताप व स्नेहल, मितांश परदेशी व गौरी, रेवा वाखरकर व रूपाली (माता-बाल्य प्री-प्रायमरी गट); तनिष्का सोनार व दिपिका, गीत आहुजा व रिमा, रुद्रांश धुमाळ व रुद्रायणी (माता-बाल्य प्रायमरी गट); के. के. क्वीन्स, नांदगाव ग्रुप, तुळजा भवानी (ग्रुप गट); रूपाली पालेजा (बेस्ट कॉस्ट्यूम); तृप्ती काळे व रुचिता कासलीवाल (मोस्ट एनर्जेटिक पेअर); सुप्रिया काळे (बेस्ट क्वीन) आणि स्नेहा जगताप (बेस्ट स्टेप) या विजेत्या झाल्या.सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com