फोटो -NSK26H32812
विहितगाव : येथील सुभाष वाचनालयात आयोजित कार्यक्रमास उपस्थित नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य.
विहितगावात वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार
--------------------------------
सुभाष वाचनालयात डॉ. कलाम जयंती साजरी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता.१७ : विहितगाव येथील सुभाष वाचनालयात माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा झाला. या वेळी नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मंत्रालयातील निवृत्त महसूल कक्ष अधिकारी अरुण गडकर यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पाळदेव शरदकुमार जाधव यांनी कलाम यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले. वृत्तपत्र विक्रेते हे जिद्दीने सामान्य जनतेपर्यंत ज्ञान पोहोचविण्याचे काम करतात असे भक्तीधाम मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कोठुळे यांनी सांगितले. या वेळी नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस सुनील मगर, राज्य संघटनेचे संघटन सचिव महेश कुलथे, ज्येष्ठ विक्रेते विजय सोनार, उल्हास कुलथे, इस्माईलभाई पठाण, उपाध्यक्ष रवी भोसले, बाबासाहेब ओहोळ, संदीप परसे, राजेंद्र काळे, सुभाष आठभाई, उत्तम गांगुर्डे, अनिल कुलथे, गौतम सोनवणे, राजेंद्र थोरमिसे, किशोर सोनवणे, सुनील शिंदे, सुखदेव जाधव, हेमंत पोटे, बाळासाहेब चंद्रमोरे, संदीप कळमकर, रवी सोनवणे, ज्ञानेश्वर गवळी, खजिनदार योगेश भट, विशाल पागिरे, इमरान शेख, दत्ता मीराने, संजय चव्हाण, संदीप मालुंजकर, शिरीष कर्णिक, विकास रहाडे आदींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव कैलास हांडाेरे यांनी तर आभार तुकाराम चव्हाणके यांनी मानले.
या कार्यक्रमास विहितगाव सोसायटी चेअरमन अनिल हांडोरे, पोपट पोरजे, शिवनाथ हांडोरे, शांताराम कोठुळे, प्रशांत हांडोरे, संजय हांडोरे, त्र्यंबक पोरजे, दिनेश हांडोरे, आत्माराम हगवणे, रामभाऊ हांडोरे, शरद हांडोरे, अमर जमधडे, अमित पाटील आदी उपस्थित होते.