रा.स्व. संघाच्या संचलनाचे शहरात स्वागत

रा.स्व. संघाच्या संचलनाचे शहरात स्वागत
Published on: 
NSK26H33110 जळगाव : विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गणेश कॉलनीतून निघालेल्या पथसंचलनात सहभागी स्वयंसेवक. --- रा.स्व. संघाच्या संचलनाचे जळगावात स्वागत उपशीर्षक विजयादशमी उत्सव उत्साहात; सहा नगरांमधून सघोष पथसंचलन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त मंगळवारी (ता.२०) जळगाव शहरातील सहा नगरांमध्ये संघाच्या वतीने सघोष पथसंचलन करण्यात आला. या संचलनात हजारो स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. शहरातील विविध भागात या संचलनाचे पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले. रा.स्व. संघातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवांमध्ये विजयादशमी उत्सव हा महत्त्वाचा मानला जातो. संघाची यंदा शताब्दी वर्षपूर्ती आहे. त्यानिमित्त शहरातील विविध ९ नगरांमधून पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पैकी सहा नगरांमध्ये मंगळवारी संचलन काढण्यात आले. छत्रपती शाहू महाराज नगरात सकाळी ७ ते ९ या वेळेत प. न. लुंकड कन्याशाळा, गणेश कॉलनी, जळगाव येथे संचलन व उत्सव झाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रांत प्रचारक स्वप्नील चामणीकर, तसेच उद्योजक स्वर्णीम जैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात गणवेशधारी १२१ स्वयंसेवक, अपूर्ण गणवेशातील १७ स्वयंसेवक, ६ महिला व ७ बाल स्वयंसेवक असे एकूण १५१ जण सहभागी झाले होते. स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. संचलन व उत्सवाच्या माध्यमातून शिस्त, संघभावना, सामूहिक सहभागाचा संदेश देण्यात आला. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. तसेच जळगाव शहरातील शिव कॉलनी, शिवाजीनगर, पंचमुखी हनुमान नगर, अयोध्या नगर आणि महाबळ या नगरांमधून सघोष संचलन काढण्यात आले. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com