पान तीन फ्लायर
---------------
३३०८८
नाशिक : पोलिस मुख्यालयात विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन करताना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक.
विजया दशमीनिमित्ताने पोलिस दलातर्फे शस्त्रपूजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : विजयादशमी निमित्ताने शहर पोलिस मुख्यालयाच्या शस्त्रागारात आयुक्त संदीप कर्णिक व नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या शस्त्रागारात अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी यांच्या हस्ते पोलिस शस्त्रांचे विधीवत पूजन झाले.
यावेळी गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त किशोर काळे, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्यासह साहाय्यक आयुक्त, पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. तर, आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात पोलिस अधीक्षकांच्या हस्ते पोलिस शस्त्रांचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विमला एम., यांच्यासह उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
विजयादशमीनिमित्त शस्त्र पूजनाची परंपरा असून, या परंपरेनुसार शहर व पोलिस दलातील शस्त्रागारात असलेल्या शस्त्रसाठ्याचे पूजन करून वंदन करण्यात आले. शस्त्रांना पुष्प अर्पण करून प्रभावी पोलिसिंग करण्यासंदर्भात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्या.
---------
अत्याधुनिक हत्यारांचे पूजन
शहर, ग्रामीण पोलिस मुख्यालयात पारंपारिक पद्धतीने विविध शस्त्रांची मांडणी करण्यात आली होती. यात अत्याधुनिक एके -४७, एमीपी-५, एसएलआर, पिस्तूल, ब्लाॅक पिस्तूल, ॲटाे पिस्तूल, पाॅईंट ३.८ रिव्हाॅल्व्हरसह काडतुसे मांडण्यात आली होती. याचप्रमाणे शहर-जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्येही शस्त्रपूजन करण्यात आले.