नरडाणात संघाचे पथसंचलन

नरडाणात संघाचे पथसंचलन
Published on: 
धुळे : टुडे पान ४ साठी... -- फोटो क्रमांक : 34109 नरडाणा : विजयादशमी निमित्त करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात सहभागी स्वयंसेवक. -- नरडाणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन -- विजयादशमी उत्सवात घोषाच्या तालावर स्वयंसेवकांचे संचलन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : नरडाणा (ता. शिंदखेडा) येथे श्रीराम साप्ताहिक मिलन शाखा व नरडाणा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सांघिक विजयादशमी उत्सव, शस्त्रपूजन आणि घोषाच्या तालावर पथसंचलन उत्साहात झाले. नरडाणा मंडळाच्या इतिहासात प्रथमच पथसंचलन करण्यात आल्याने परिसरातील स्वयंसेवकांमध्ये व नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. - विजयादशमी उत्सवानिमित्त पारंपरिक शस्त्रपूजनाने सुरुवात झाली. नंतर घोषाच्या तालावर स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन केले. हातात दंड घेतलेल्या स्वयंसेवकांच्या संचलनातून शिस्त, संघभावना आणि एकजुटीचे दर्शन घडले. या सोहळ्यात नरडाणा मंडळातील विविध गावांसह परिसरातील इतर मंडळांतील स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. डॉ. संजय महाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्ते तथा शिव शंभू विचार मंचचे जिल्हा संयोजक प्रा. हर्षल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. संघाने व्यक्तिनिर्माण, समाजजागृती, सेवाकार्य, सामाजिक समरसता आणि राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून साधलेल्या योगदानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शताब्दी वर्षानिमित्त स्वयंसेवकांनी समाजाशी संपर्क वाढवून राष्ट्रहितासाठी कार्य करावे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. - उत्सवापूर्वी जिल्हा संघचालक हितेंद्र जैन यांनी उपस्थित राहून स्वयंसेवकांची भेट घेतली. तालुका कार्यवाह विनोद देसले, तालुका शारीरिक प्रमुख दीपक सोनार, नरडाणा मंडळाचे मंडळ प्रमुख भावेश भामरे, महेश सिसोदे, रोहित बोरसे, ऋषिकेश भामरे यांच्यासह ज्येष्ठ स्वयंसेवक, नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.