उपनगरांमधून २१०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा सहभाग

उपनगरांमधून २१०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा सहभाग
Published on: 
पान चार मेन --------------------------- 33083 नाशिक : विजयादशमी निमित्त शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनात सहभागी झालेले स्वयंसेवक. 33098 उपनगर : विजयादशमीनिमित्त पद संचालन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य. 12961 इंदिरानगर : पाथर्डीफाटा भागात पथ संचलन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य. 17960 नाशिक रोड : विजयादशमी उत्सवानिमित्त पथसंचलन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक. 07578 देवळाली कॅम्प : संसारी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीच्या निमित्ताने संचलनात सहभागी झालेले स्वयंसेवक सघोष पथसंचलनाने वेधले नाशिककरांचे लक्ष उपनगरांमधून २१०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२० : असत्‍यावर सत्याच्या आणि अन्यायावर न्यायाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमी उत्सवाच्या औचित्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नाशिक शहरात विविध उपनगर, नगर व गटांच्या वतीने पूर्ण गणवेषात आणि स-दंड भव्य विजयादशमी पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले. या शिस्तबद्ध संचलनांनी आणि शस्त्रपूजन कार्यक्रमांनी नाशिक नगरीत देशभक्तीमय व उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. शहराच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या या संचलनांमध्ये विविध शाखांमधून आलेल्या २१०० पेक्षा अधिक तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक व प्रौढ स्वयंसेवकांनी शिस्तीत सहभाग नोंदवला. शहरातील विविध नगरांमध्ये परंपरेनुसार उत्साहात शस्त्रपूजन आणि संचलनाचे आयोजन करण्यात आले. या पथसंचलनाचे नियोजन खालीलप्रमाणे यशस्वीरीत्या पार पडले. या संचलन व शस्त्रपूजन सोहळ्यात विविध भागांत शहरातील प्रतिष्ठित व मान्यवर नागरिकांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी मधुकर कड, महंत भक्तीचरणदास, सराफ व्यावसायिक जय भोसले, विख्यात त्वचारोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद देशमुख आणि निवृत्त पोलीस अधिकारी प्रभाकर घाडगे आदी मान्यवरांनी स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला. --- नागरिकांकडून पुष्पवृष्टी शिस्तबद्ध पदमिलाफ, तालबद्ध घोष आणि स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संचलनाने नागरिकांचे लक्ष वेधले. जागोजागी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिलेल्या नागरिकांनी, महिलांनी आणि ज्येष्ठांनी पुष्पवृष्टी करत या शिस्तबद्ध संचलनाचे अत्यंत उत्साहात व भावपूर्ण स्वागत केले. ‘भारत माता की जय’ आणि वंदे मातरम च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. -------- विविध नगरांतून सघोष पथसंचलन मखमलाबाद नगरात श्री साई गणेश मंदिर, सुदर्शन नगर येथून निवृत्त पोलिस अधिकारी प्रभाकर घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचलन काढण्यात आले. एकलहरा नगरात मारुती मंदिर, अस्वले मळा येथे शस्त्रपूजन उत्सवानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पळसे गाव येथून संचलनाला सुरुवात झाली. उपनगरात सुभेदार रामजी सभागृह येथून निघालेले संचलन मनपा हॉस्पिटल, महारुद्र कॉलनी, इच्छामणी गणपती मंदिर आणि व्यापारी बँक चौक मार्गे पार पडले. पवननगरात डॉ. हेडगेवार मैदान येथून सुरू झालेले संचलन पोस्ट ऑफिस, पाटीलनगर मैदान येथे संपले. अंबड नगरात पथसंचलन झाले. जुने सिडको नगरात अपेक्षा हॉस्पिटलासमोरील मैदानावरून अपोलो मेडिकल मार्गे संचलन झाले. पंचवटी गटात ४४ मेनरोडवरील श्री गणपती मंदिर येथे स्वयंसेवक एकत्र आले. टिळक नगर व सोमेश्वर नगरात अनुक्रमे केबीटी इंजिनिअरिंग कॉलेज मैदान आणि महात्मा नगर क्रिकेट मैदान येथून संगीतमय घोष पथकाच्या तालावर संचलन झाले. --- जुने नाशिक परिसर विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्यातर्फे मंगळवारी (ता. २०) पंचवटी गटाचे जुने नाशिक परिसरातून पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. सकाळी आठला पथसंचलनास सुरुवात झाली. संचलनात सुमारे १५० ते २०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. कुंतक सुरेश गायधनी, गट कार्यवाहक, पंचवटी गट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातर्फे पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. ---- उपनगर, जेल रोड परिसर विजयादशमी निमित्ताने उपनगर, जेलरोड स्वयंसेवकांचे संचलन उत्साहात पार पडले. या संचलनात ३५० हून अधिक स्वयंसेवक सहभागी होत अनुशासन, स्वयंशिस्त एकात्मतेचे दर्शन घडवले. जेलरोड उपनगरातील रामजी आंबेडकर सभागृहाच्या मैदानावर सकाळी साडेसात वाजता स्वयंसेवक एकत्र जमले. त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने संचलनाला प्रारंभ झाला. --- पाथर्डी फाटा परिसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुगोविंद सिंगनगर तर्फे दसऱ्यानिमित्त पाथर्डी फाटा परिसरात सघोष पथसंचलन करण्यात आले. संघाचे जिल्हा कार्यवाह सुहास वैद्य आणि उद्योजक श्री .कातोरे प्रमुख पाहुणे होते. आर. के .लॉन्स पासून सुरू झालेल्या संचालनास प्रारंभ झाला. बँडच्या तालावर पारंपारिक संघाच्या वेशभूषेत स्वयंसेवक सहभागी झाले होते. भाजप गटनेते ॲड .श्याम बडोदे, सभापती बाळकृष्ण शिरसाठ, भगवान दोंदे, नगर कार्यवाह विश्वनाथ काळे, अमित बुडूख आदी सहभागी झाले होते. --- सातपूर परिसर सातपूर : विजयादशमीच्या निमित्ताने सातपूर श्रमिकनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिस्तबद्ध वातावरणात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. शेकडो गणवेशधारी स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध पावलांनी, देशभक्तिपर घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षणतज्ज्ञ पांडुरंग मोरे, कृपाशंकर सिंग आणि डॉ. दत्तप्रसाद मोरे, ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील, सातपूर सभापती समाधान देवरे, नगरसेवक नितीन निगळ, रामहरी संभेराव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो स्वयंसेवक पथसंचलनात सहभागी झाले होते. ----- नाशिक रोड परिसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त नाशिक रोड परिसरात यंदा मुक्तिधाम, जेलरोड, एकलहरे आणि सावरकरनगर अशा चार ठिकाणी पथसंचलन व शस्त्रपूजनाचे आयोजन करण्यात आले. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर स्वयंसेवकांनी गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने घोषपथकासह पथसंचलन केले. चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटांतील स्वयंसेवकांचा सहभाग लक्षवेधी ठरला. शहरातील नागरिकांनी पथसंचलनाचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढून उत्सवाचे स्वागत करण्यात आले. शिस्त, सामूहिक सहभाग आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या संचलनातून नाशिक रोडकरांच्या सामूहिक उत्साहाचे दर्शन घडले. संसारी येथे पथसंचलन विजयादशमीनिमित्त संसारी (सावरकरनगर) येथे पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. शिस्तबद्ध गणवेश, घोषाच्या लयीत पडणारी पावले आणि भगव्या ध्वजाच्या साक्षीने संपूर्ण संसारी परिसर राष्ट्रभक्तीमय झाला होता. सकाळी ७.३० वाजता ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्रांती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष सुधाकर गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी नाशिक शहराचे सहकार्यवाह रोहित गायधनी हे संचलन निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या पथसंचलनात संसरी, देवळाली कॅम्प, भगूर, विजयनगर, लहवित, देवी मंदिर, शेवगेदारणा या शाखांमधील १३७ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com