Graduate Constituency : नाशिकच्या मैदानात विखे- थोरातांची पारंपरिक लढत

Radhakrishna Vikhe Patil & Balasaheb thorat
Radhakrishna Vikhe Patil & Balasaheb thoratesakal

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी सत्ताधारी भाजप सरसावली आहे. सलग तीनवेळा विजयाची हॅट्ट्रिक करणारे काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना टक्कर देण्यासाठी भाजपने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू तथा प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे.

त्यासाठी भाजपने डॉ. विखे व नाशिक येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांची नावे दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहेत. विखे यांची उमेदवारी अंतिम झाल्यास विखे यांचे विरोधक तथा काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. तांबे यांच्यात रंगतदार सामना होऊ शकतो. या निवडणुकीनिमित्तने विखे-थोरात हा परंपरागत राजकीय सामना होण्याची शक्यता आहे. (Vikhe patil versus balasaheb Thorat traditional fight in Nashik field on Graduate Constituency of legislative council nashik News)

नाशिक आणि अमरावती विभागात पदवीधर मतदारसंघाचा तर औरंगाबाद व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधरांची नावनोंदणी सुरू आहे. नोंदणीसाठी ७ नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. मात्र नोंदणीला मिळालेला अल्प प्रतिसाद बघता ही मुदत निवडणूक आयोगाकडून वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नोंदणी सुरू असताना मतदारसंघासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. तीन निवडणुकांपासून या मतदारसंघावर डॉ. सुधीर तांबे यांच्या रूपाने काँग्रेसचे वर्चस्व आहे.

२०१७ मध्ये राज्यासह केंद्रात भाजपची सत्ता असतानाही हा मतदारसंघ भाजपला मिळवता आला नाही. आमदार तांबे यांच्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी गेल्या तिन्ही निवडणुकीत ताकद पणाला लावली होती. डॉ. विखे उमेदवार असल्यास नामदार विखे स्वतः मैदानात उतरून ताकद पणाला लावतील. गतवेळी दावेदारी सांगणारे हेमंत धात्रक यांनीही यंदा भाजपकडून उमेदवारी मागितली आहे. त्यांच्या नावासाठी भाजप अंतर्गत एक गटदेखील आग्रही आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने विखे व धात्रक यांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहेत.

Radhakrishna Vikhe Patil & Balasaheb thorat
Exclusive News : नाशिकच्या कार्यकर्त्यांची 13 महिन्याच्या चिमुरड्यासाठी माणुसकी

मतदारसंघात चुरशीच्या लढती

नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगरचा समावेश असलेला पदवीधर मतदारसंघ पूर्वी भाजपच्या ताब्यात होता. (स्व.) ना. स. फरांदे यांनी मतदारसंघावर भाजपचा वरचष्मा निर्माण केला होता. त्यांच्यानंतर माजी खासदार प्रतापदादा सोनवणे याच मतदारसंघातून दोनदा विजयी झाले. धुळे लोकसभा मतदारसंघात सोनवणे विजयी झाल्याने २००९ मध्ये या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली.

त्या वेळी हिरे, ॲड. नितीन ठाकरे, डॉ. तांबे अशी तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीत तांबे यांनी बाजी मारली. त्यानंतर सन २०११ मध्ये भाजप नेते प्रा. सुहास फरांदे व तांबे यांच्यात लढत झाली. त्यात तांबे यांनीच विजय मिळवला. सन २०१७ मध्ये तांबे यांनी भाजपचे डॉ. प्रशांत पाटील यांचा पराभव करून हॅट्रिक साधली होती.

Radhakrishna Vikhe Patil & Balasaheb thorat
No Objection Certificate : ना हरकत दाखल्यापोटी सिडकोकरांडून वसुली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com