
नाशिक जिल्ह्यात दीड लाख वीजग्राहकांना बारा कोटींची दंड व व्याजमाफी
नाशिक : महावितरण कंपनीच्या विलासराव देशमुख अभय योजनेत जिल्ह्यात कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या एक लाख ४२ हजार २२८ ग्राहकांकडे मूळ थकबाकी ८५ कोटी ३८ लाख इतकी असून त्यावरील व्याज व दंड रकमेत ११ कोटी ९२ लाख रुपयांची सूट व पुर्नजोडणीची संधी मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील कायमस्वरूपी विद्युत पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांसाठी थकबाकीतील व्याज व दंड रक्कम माफ होणार आहे. त्यात, नाशिक मंडळात चांदवड विभागात दहा हजार ८१६ ग्राहकांकडे मूळ थकबाकी सहा कोटी १८ लाख, व्याज व दंड ८२ लाख रुपये. नाशिक ग्रामीण विभागात ३१ हजार २५ ग्राहक, मूळ थकबाकी १६ कोटी ६९ लाख त्यावर व्याज व दंड दोन कोटी नऊ लाख रुपये.
नाशिक शहर एक विभाग १२ हजार ४६९ ग्राहकांकडे मूळथकबाकी आठ कोटी ८६ लाख रुपये, व्याज व दंड एक कोटी १९ लाख रुपये. नाशिक शहर दोन विभाग २९ हजार ५३१ ग्राहकांकडे मूळथकबाकी १८ कोटी २१ लाख रुपये, व्याज व दंड दोन कोटी २८ लाख. एकूण नाशिक मंडळात ८३ हजार ८४१ ग्राहकांकडे मूळथकबाकी ४९ कोटी ९५ लाख रुपये असून त्यावर व्याज व दंड सहा कोटी ४० लाख रुपये आहे.
मालेगाव मंडळात कळवण विभागात १० हजार ५९५ ग्राहकांकडे मूळथकबाकी चार कोटी ५६ लाख, व्याज व दंड ६६ लाख रुपये. मालेगाव विभागात २० हजार ६०३ ग्राहकांकडे मूळ थकबाकी १५ कोटी १२ लाख रुपये, व्याज व दंड दोन कोटी ५३ लाख रुपये. मनमाड विभागात १८ हजार ४१ ग्राहकांकडे मूळथकबाकी ११ कोटी ४९ लाख, व्याज व दंड दोन कोटी ८ लाख रुपये. सटाणा विभागात नऊ हजार १४८ ग्राहकांकडे मूळ थकबाकी चार कोटी २४ लाख, व्याज व दंड ५६ लाख रुपये. एकूण मालेगाव मंडळात असलेल्या ५८ हजार ३८७ ग्राहकांकडे मूळ थकबाकी ३५ कोटी ४२ लाख असून त्यातील व्याज व दंड रकमेत पाच कोटी ५१ लाख इतकी सुट मिळेल.
एकूण नाशिक जिल्ह्यात असलेल्या दोन्ही मंडळात एकूण एक लाख ४२ हजार २२८ ग्राहकांकडे मूळ थकबाकी ८५ कोटी ३८ लाख इतकी असून त्यातील व्याज व दंड रकमेत ११ कोटी ९२ लाख इतकी सुट मिळणार आहे.
Web Title: Vilasrao Deshmukh Abhay Yojana Benefit Customers Electricity Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..