नाशिक : दोन वर्षांनंतर गावोगावी यात्रा-जत्रांना उधाण

शासनाने बहुतांश निर्बंधही शिथिल केल्याने ग्रामीण भागातल्या यात्रा जत्रांना दोन वर्षानंतर गती आली आहे.
Jatra
Jatraesakal
Updated on

चांदोरी (जि. नाशिक) : सध्या कोरोनाची (Corona) धास्ती कमी झाल्याने आणि शासनाने बहुतांश निर्बंधही शिथिल केल्याने ग्रामीण भागातल्या यात्रा जत्रांना दोन वर्षानंतर गती आली आहे. ग्रामदैवतांच्या यात्रांच्या निमित्ताने अर्थचक्रालाही गती मिळाल्याने गावोगावी उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनाच्या आगमनानंतर गेल्या दोन वर्षांपासून जत्रा-यात्रांमध्ये होणाऱ्या गर्दीचा विचार करून शासनाने सण-समारंभावर निर्बंध लावले होते. ग्रामदैवत आणि कुलदैवतांची मंदिरे गर्दी व तत्सम धोके टाळण्यासाठी बंद होती, ती खुली झाली आहेत.

साहजिकच सर्वजण कोरोना संसर्गाच्या भीतीखाली वावरत होते. निर्बंध आणि संसर्ग यामुळे दोन वर्षे यात्राच भरल्या नव्हत्या. यात्रा-जत्रांना नेहमी फिरकणारे पाहणे कोणत्याही पाहुण्याचा चुकूनही उंबरा चढत नव्हते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नाशिक-पुण्याला असणाऱ्या चाकरमाण्यासह पाहुण्यांचा राबता गावोगावी यात्रा-जत्रांच्या निमित्ताने वाढला आहे. यात्रेच्या निमित्ताने पै-पाहुणे एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करण्याबरोबरच नात्यांचा जिव्हाळा जपत होते.

Jatra
नाशिक : दीपक पांडेंचा भोंग्यांचा ‘तो’ आदेश पोलीस आयुक्तांकडून रद्द

सलग दोन वर्षे यात्रा बंद झाल्याने फिरत्या व्यावसायिकांचा आर्थिक कणाच मोडला होता. यामध्ये मिठाईवाले, गुलाल, खोबरे विकणारे, आईस्क्रीमचे गाडे, खेळणी या व्यावसायिकांचा समावेश होता. त्यांचीही गाडी पुन्हा यात्रेच्या निमित्ताने रुळावर येत आहे.

तमाशाचे आकर्षण

ग्रामीण भागातल्या यात्रा-जत्रांमधून पार पडणारा पारावरच्या लोककलावंतांचा तमाशा याशिवाय यात्रा पूर्णच होऊ शकत नाही. मात्र, दोन वर्षे बंद असलेला तमाशाचा फड आता यानिमित्त पुन्हा नव्या उमेदीने उभा राहताना गावोगावी दिसत आहे.

भैरवनाथ महाराज यात्रोत्सव

चांदोरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांची यात्रा शुक्रवार (ता.२९) पासून सुरू होत आहे. त्यात सकाळी कावडी मिरवणूक आणि रथ मार्गावरील घरासमोर उत्कृष्ट रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे. संध्याकाळी पाचला महाराजांच्या रथाची मिरवणूक आणि रात्री नऊला लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (ता.३०) सकाळी सातला लोकनाट्य तमाशा हजेरीचा कार्यक्रम मंदिरात होणार आहे.

Jatra
लग्नाच्या 2 दिवस आधी रंगताय मेहंदी समारंभ; लग्न खर्चात होतेय वाढ

भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पंच कमिटीने केले आहे. मंदिर व परिसराची ग्रामपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता व पाण्याची सोय केली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Vidhan Parishad Election
What caused traffic congestion at Dwarka Chowk?
Declining rainy days impact on Nashik agriculture
Onion Purchase Irregularities Worth ₹54 Crore Surface; Investigation Demand Grows
Marathi News Esakal
www.esakal.com