प्रशासकीय कारभाराने गावगाड्याचा कारभार संथ

प्रशासकीय कारभाराने गावगाड्याचा कारभार संथ
Published on: 
ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेवर घ्या --------------- गावागावांतून मागणी ः एका प्रशासकाकडे पाच ते सात गावांमुळे ग्रामस्थांची गैरसोय --------------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१४ ः मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांमार्फत कारभार सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. एका प्रशासकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे न ढकलता वेळेत घ्याव्यात, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. -------------- निवडणुकांच्या दृष्टीने प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या ३० नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, त्यानंतर ग्रामपंचायतनिहाय मतदार याद्या तयार करून त्या अंतिम करण्याची प्रक्रिया होईल. त्यामुळे निवडणुकांसाठीची बहुतांश पूर्वतयारी पूर्णत्वाकडे जात असताना निवडणुका घेण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती, गटारी आणि इतर मूलभूत प्रश्नांसाठी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, सध्या अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती आहे. एका प्रशासकाकडे दहा किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कार्यभार असून, त्यांना मूळ शासकीय कामकाजही सांभाळावे लागते. त्यामुळे प्रत्येक गावासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. अनेकदा महिन्यातून दोन दिवसही प्रशासकांना गावासाठी देता येत नसल्याची तक्रार आहे. दुष्काळी स्थिती पाहता पिण्याच्या पाण्याचे नियोजन, टँकरची मागणी, जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था, जलसंधारणाची कामे आणि रोजगार हमी योजनांचा पाठपुरावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.