Nashik Crime News : गावठी कट्ट्याने मारून केली दुखापत; दोघा संशयितांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Crime News

Nashik Crime News : गावठी कट्ट्याने मारून केली दुखापत; दोघा संशयितांना अटक

नाशिक : इंदिरानगर बोगद्याजवळ गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याच्या घटनेला २४ तास होत नाही तोच, म्हसरूळ गावात भांडणाची कुरापत काढून एकाने गावठी कट्टयाने मारून दुखापत केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. (Villager beaten with stick and injured Both suspects arrested Nashik Crime News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Crime News : खोट्या अनुभवपत्रामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

रिकेश गणेश सोलंकी (२४, रा. बेलदारवाडी, दिंडोरी रोड) व रोहित खंडू गांगुर्डे (२३, रा. फुलेनगर), अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी राजेश देविदास पवार (रा. प्रभातनगर, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता.५) सायंकाळी सातच्या सुमारास म्हसरूळ गावातील बुद्धविहारासमोर संशयित रिकेश व रोहित यांनी कुरापत काढून वाद घातला.

राजेशचा भाऊ मनोज पवार व संशयितांमध्ये वाद झाला होता. याबाबत राजेश हा संशयितांची समजूत काढत असल्याचा राग आल्याने दोघांनी राजेशसह त्याचा भाऊ मनोज पवार यास शिवीगाळ करीत दमदाटी केली. तर, संशयित रोहितने त्याच्याकडील बंदुकीसारखे हत्यार काढून राजेशच्या डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यात राजेशच्या डोक्यात दुखापत झाली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. सहायक निरीक्षक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : मुंबई नाका पोलिसांकडून लॅपटॉप चोरट्यास अटक