Vinchur Prakasha Highway : भाबडबारी घाटात सुरक्षा जाळ्या लावण्याचे राजेंद्र सोनवणे यांचे निर्देश!
Vinchur-Prakasha Highway Concrete Work Progress : विनचूर-प्रकाशा महामार्गाच्या कामावर सुरक्षा जाळे लावण्याचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिले आहे.
देवळा- विंचूर- प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग ७५२ वरील भावडघाट ते गुंजाळनगर या रखडलेले कॉक्रीटीकरण काम गतीने सुरु आहे. घाटातील रुंदीकरण करण्यासाठी काम सुरू आहे. मात्र हे डोंगरप्रवण क्षेत्रात सुरु असल्याने जाळ्या लावण्याची मागणी आहे.