विनोद मित्तल सन्मानित

विनोद मित्तल सन्मानित
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी... --- फोटो क्रमांक : 35206 नवी दिल्ली : विशेष समारंभात प्रतिष्ठित ‘महाराजा अग्रसेन ग्लोबल आयकॉन ॲवॉर्ड’ मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना ज्येष्ठ उद्योजक विनोद मित्तल. --- ‘अग्रसेन ग्लोबल आयकॉन’ने मित्तल सन्मानित नवी दिल्लीत प्रतिष्ठित पुरस्काराने गौरव; धुळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : समाजसेवा, शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद मित्तल यांना नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित ‘महाराजा अग्रसेन ग्लोबल आयकॉन ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. अग्रवाल समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा बहुमान प्रदान करण्यात आला. विनोद मित्तल यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील यशामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या विशेष समारंभात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. भारतासह जगभरातील विविध देशांमध्ये कार्यरत असलेल्या अग्रवाल समाजातील मान्यवर, खासगी व शासकीय क्षेत्रांतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती आणि समाजकार्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय मंत्री विपुल गोयल आणि महामंडलेश्वर ज्ञानानंद महाराज यांच्या हस्ते मित्तल यांना महाराजा अग्रसेन यांची मूर्ती, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश अग्रवाल, गिरीश अग्रवाल, अजय अग्रवाल, सुनील अग्रवाल, अनुप गिंदोडिया, अनिल अग्रवाल, सुनील सिंघानिया, सौरभ गिंदोडिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शहराचा गौरव ज्येष्ठ उद्योजक विनोद मित्तल यांनी सामाजिक कार्यासह शिक्षणाचा प्रसार व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सातत्याने योगदान दिले आहे. तसेच अग्रवाल समाजाला संघटित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने शहराची ओळख अधिक भक्कम झाली आहे. या बहुमानाबद्दल शहरासह राज्यभरातील अग्रवाल समाजबांधवांकडून मित्तल यांचे कौतुक झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.