Viral Disease: स्‍वच्‍छता, सावधगिरीतून राहा निरोगी! शहरात साथीच्‍या आजारांमुळे आरोग्‍यविषयक तक्रारींत वाढ

Monsoon Viral Diseases
Monsoon Viral Diseasessakal

Viral Disease : गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणातील सातत्‍याने होत असलेले बदल व इतर विविध कारणांनी साथीच्‍या आजारांमध्ये वाढ झालेली आहे. सर्दी-खोकल्‍यापासून डेंगी, मलेरिया व कावीळ यांसारख्या आजारांचे निदान शहरवासीयांना होत आहे.

अशा परिस्‍थितीत वैयक्‍तिक व सभोवतालची स्‍वच्‍छता राखत व सावधगिरी बाळगताना निरोगी राहण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे. (Viral Disease Stay healthy through cleanliness caution Increase in health complaints due to epidemics in city nashik)

गेल्‍या महिन्‍यात शहरात डोळ्यांची साथ आली होती. हे प्रमाण घटत असतानाच दुसरीकडे सर्दी, थंडी-ताप, डेंगी, श्‍वसनाचे विचारांच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे.

यातून रुग्‍णालयांतील बाह्य रुग्‍ण विभागात नेहमीपेक्षा रुग्‍णसंख्येत सुमारे २० टक्क्‍यांनी वाढ झाल्‍याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. संसर्गजन्‍य आजारांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सावधगिरीचा इशारा जाणकारांकडून दिला जातो आहे.

वातावरणातील बदल धोकादायक

गेल्‍या काही दिवसांपासून कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण, रिमझिम सरी बरसत आहेत. वातावरणातील या बदलांमुळे संसर्गाचा धोका वाढला असल्‍याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदविले आहे. विशेषतः श्‍वसनाचे विकार अशा वातावरणात बळावत असल्‍याचे सांगितले जाते आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Monsoon Viral Diseases
Accident News: नाशिक-चांदवड महामार्गावर भीषण अपघात; भाजपच्या नगरसेवकासह 4 जणांचा जागीच मृत्यू

...अशी घ्या आरोग्‍याची काळजी

- गरम, ताजे व पौष्टिक अन्न सेवन करावे

- श्‍वसनाचे विकार असलेल्‍यांनी विशेष काळजी घ्यावी

- स्‍वच्‍छ पाणी प्‍यावे, थंड पेय किंवा बाहेरील पेय टाळावे

- गर्दीत जाण्याचे टाळावे, अन्‍यथा किमान मास्‍क वापरावा

- सकाळी लवकर चालण्याचा व्‍यायाम करावा

- योगासने व इतर व्‍यायामांतून सुदृढ राहावे

- उघड्यावरील किंवा शिळे अन्न खाण्याचे टाळावे

- आरोग्‍यविषयक तक्रार जाणवल्‍यास अनुभवी, तज्‍ज्ञ डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्यावा

- घरातील व परिसरातील वातावरण स्‍वच्‍छ ठेवावे

- पाण्याचे डबके साचणार नाही, याची काळजी घ्यावी

- रात्रीच्‍या वेळेत पुरेशी झोप घ्यावी

"गेल्‍या काही दिवसांपासून विविध कारणांनी संसर्गजन्‍य आजारांनी त्रस्‍त रुग्‍णांच्‍या संख्येत वाढ झालेली आहे. गर्दीच्‍या ठिकाणी जाण्याचे टाळावे, अन्‍यथा मास्‍कचा वापर करावा. डेंगी‍च्‍या डासांची उत्‍पत्ती टाळण्यासाठी पाणी साचू देऊ नये. आरोग्‍यविषयक तक्रार जाणवल्‍यास वेळीच तज्‍ज्ञ डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्यावा."- डॉ. शिरीष देशपांडे, ज्‍येष्ठ फिजिशियन

Monsoon Viral Diseases
Nashik News: आयुक्तांकडून अवैध धंद्यांविरोधात ‘समज’! लेखी दिल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे धाबे दणाणले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com