Crime
sakal
नाशिक रोड: रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेल रोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टी भागातील पाच जणांना उपनगर पोलिसांनी अटक केल्यावर त्यांची मंगळवारी (ता. १४) धिंड काढण्यात आली. आरोपींनी स्वतःहून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असे म्हणत माफी मागितली.